भाजपा कार्यकर्त्यांनी केली “खोकण्याची’ नक्‍कल

केजरीवाल यांच्या भाषणावेळी कुरापत

नवी दिल्ली – दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाषण देत असताना भाजप कार्यकर्त्यांनी विचित्र कुरापत केली आहे. त्यामुळे कार्यक्रम सुरू असताना भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाच भाजप कार्यकर्त्यांना रोखावे लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये केजरीवाल भाषण देताना दिसत आहे. त्यांचे भाषण सुरू असताना भाजप कार्यकर्ते मुद्दाम खोकून त्यांच्या भाषणात व्यत्यय आणत होते. हा कार्यक्रम यमुना नदीच्या सफाईसंदर्भात होता. यावेळी गडकरी यांनी कार्यकर्त्यांना असे करण्यापासून रोखले.

याच कार्यक्रमात बोलतांना गडकरी यांनी क्‍लीन गंगा मिशनबाबत मोठे विधान केले आहे. पुढील तीन महिन्यात 80 टक्के गंगा स्वच्छ होईल असे सांगितले आहे. 2019 मार्च पर्यंत गंगा पूर्णपणे स्वच्छ होईल असे सांगितले.

नमामि गंगे कार्यक्रमाअंतर्गत यमुना नदी सफाईसाठी 11 प्रकल्प राबिण्यात येणार आहे. 2018 गंगा स्वच्छतेची डेडलाईन ठेवण्यात आली होती. मात्र या मुदतीत गंगा स्वच्छ होऊ शकली नाही. त्यामुळे नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने याबाबत नाराजी व्यक्‍त केली. 2019 पर्यंत यमुना नदी स्वच्छ करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. त्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)