गेल्या दहा वर्षात 384 वाघांची हत्या 

नोएडा : देशात गेल्या दहा वर्षात एकूण 384 वाघांची हत्या करण्यात आली आहे अशी माहिती माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाली आहे. सन 2008 ते 2018 या काळातील ही आकडेवारी आहे. या काळात या संबंधात एकूण 961 जणांना अटक करण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.

नोएडातील वकिल रंजन तोमर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली होती. या संबंधात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी किती जणांना वाघांच्या शिकारी बद्दल शिक्षा झाली आहे याची माहिती मात्र या विभागाकडे उपलब्ध नाही. देशात वाघांची या आधी शिरगणती करण्यात आली होती.

-Ads-

2014 साली करण्यात आलेल्या शिरगणतीनुसार देशात त्यावेळी एकूण 2226 वाघ अस्तित्वात होते. तथापी गेल्या चार वर्षात त्यांची संख्या कमी झाली की वाढली याचीही माहिती मिळालेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)