मौसमी चॅटर्जींना उच्च न्यायालयाचा दिलासा 

कन्येशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे पोहचवण्याचे दिले आदेश 

मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मौसमी यांना कन्येशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे पोहचवण्याचे आदेश न्यायालयाने जावई डिकी सिन्हा यांना दिले आहेत. कोमात गेलेली कन्या पायल सिन्हाची जावयाने भेट घेऊ न दिल्याचा आरोप करत मौसमी चॅटर्जी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणी आज झालेल्या सुनावणी वेळी डिकी सिन्हा यांनी मौसमी चॅटर्जी यांचे आरोप फेटाळूल लावले. मौसमी चॅटर्जी आणि त्यांचे पती जयंत मुखर्जी यांना लावलेले आरोप तथ्यहीन आहेत. पत्नीची भेट घेण्यापासून सासू-सासऱ्यांना मी कधीही रोखले नाही. इतकेच काय, ज्या दिवशी याचिका दाखल केली, त्याच दिवशी दोघांनी तिची भेट घेतली. याचे सीसीटीव्ही फूटेज आहेत, असा दावा सिन्हा यांनी केला.

तसेच यापुढे जेव्हा-जेव्हा मौसमी आणि जयंत यांना मुलीची भेट घ्यायला यायचे असेल, त्यांनी खुशाल यावे. पती म्हणून मी पायलची व्यवस्थित काळजी घेत आहे. देखभालीसाठी प्रशिक्षित नर्सही ठेवली आहे, असे डिकी सिन्हा यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण परस्पर सामंजस्याने सोडवण्याचे आदेश दिले. कुठलाही आक्षेप असल्यास पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकता, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)