क्रुड वापरात भारत दुसऱ्या क्रमांकावर झेपावणार

नवी दिल्ली – तेलाची सर्वाधिक मागणी असलेली जगातील दुसरी मोठी बाजारपेठ भारत बनणार आहे. वाहनांसाठी इंधनाची वाढती गरज आणि घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या मागणीत वाढ पाहता 2019 सालात अमेरिकेखालोखाल हे स्थान भारताकडून पटकावले जाण्याची शक्‍यता आहे.

वूड मॅकेन्झीच्या अहवालानुसार भारताचा जागतिक तेल मागणीत 14 टक्के वाटा म्हणजे प्रति दिन 2,45,000 पिंप असा वाटा आहे. दोन वर्षांपूर्वीच्या नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या वस्तू व सेवा करासारख्या करसुधारणेतून देशाची वार्षिक सरासरी इंधन मागणी मंदावल्याचा परिणाम दिसला असला, तरी सरलेल्या 2018 सालात त्यात पुन्हा पूर्वीसारखीच वाढ दिसून आल्याचे हा अहवाल सांगतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एप्रिल ते डिसेंबर 2018 या नऊ महिन्यांत भारतात 15.74 कोटी टन पेट्रोलियम पदार्थाचा वापर केला गेला आहे. जो आधीच्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत 2.5 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये भारताकडून एकूण 20.63 कोटी टन इंधन जाळले गेले आहे. त्यामुळे विद्यमान 2019 सालात हाच वृद्धी दर कायम राहिला तर सध्या तिसऱ्या स्थानावर असलेला भारत या आघाडीवर चीनलाही मागे टाकेल, असे वूड मॅकेन्झीचे भाकीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)