परिहार हत्या प्रकरणातील काही संशयित ताब्यात

file photo

जम्मू  – जम्मू काश्‍मीरातील भाजप नेते अनिल परिहार आणि त्यांच्या बंधुंच्या हत्या प्रकरणातील काहीं संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या 1 तारखेला या बंधुंची हत्या झाल्यानंतर किश्‍तवार जिल्ह्यात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तेथे लागू करण्यात आलेली रात्रीची संचारबंदी आता उठवण्यात आली आहे.

आम्ही या हत्याकांडांच्या संबंधात काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी या तपासाच्या संबंधात दोन विशेष तपास पथके स्थापन केली आहेत. दरम्यान लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट रणबिरसिंग यांनी आपल्या अखत्यारीत येणाऱ्या किश्‍तवार जिल्ह्यातील सुरक्षा स्थितीचा एका बैठकीत आढावा घेतला. कोणत्याही आव्हानात्मक स्थितीचा खंबीर मुकाबला करण्याच्या सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)