कॉंग्रेसकडून शहरी माओवाद्यांना पाठिंबा : नरेंद्र मोदी

छत्तीसगडमधील सभेमध्ये पंतप्रधानांची टीका

जदगालपूर – गरीब आदिवासी युवकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणाऱ्या शहरी माओवाद्यांना कॉंग्रेस पाठिंबा देत आहे, असा आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. छत्तीसगडमध्ये या महिन्याच्या अखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचारासाठी आपल्या पहिल्या सभेमध्ये ते बोलत होते. कॉंग्रेस पक्ष आदिवासींची चेष्टा करत असल्याची टीकाही पंतप्रधानांनी केली.

“कॉंग्रेसकडून आदिवासींची चेष्टा का केली जात आहे, हे समजत नाही. ईशान्य भारतात सभेसाठी गेलो असता मी, पारंपारिक वेशभुषा परिधान केली होती. मात्र कॉंग्रेसने त्याचीही चेष्टा केली होती. हा तर आदिवासी संस्कृतीचा अवमान आहे.’ असे पंतप्रधान म्हणाले.

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगड राज्य समृद्ध असण्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यात आपण कोणतीही हयगय करणार नाही. मात्र या नक्षल प्रभावित बस्तर भागाच्या विकासासाठी कॉंग्रेस नेतृत्वाखालील सरकारने काहीही केले नव्हते. त्यासाठी नक्षलवादाचे कारण दिले जात होते.

शहरी माओवादी एअर कंडिशन्ड घरांमध्ये राहतात. एकदम टिपटॉप राहतात. त्यांची मुले विदेशात शिकतात. ते नक्षल प्रभावित भागातील आदिवासींच्या मुलांवर दूरूनच नियंत्रण ठेवतात, असे मोदी म्हणाले. जेंव्हा नक्षलवाद्यांविरोधात सरकार कारवाई करते, तेंव्हा कॉंग्रेसकडून शहरी माओवादाला पाठिंबा का दिला जातो, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.

कॉंग्रेसच्यावतीने दलित, मागास आणि आदिवासींबाबत बोलले जाते. मात्र कॉंग्रेसच्यावतीने त्यांचा केवळ मतपेढी म्हणूनच विचार केला जातो आहे. मात्र आपले सरकार कधीही कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांच्या विकास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)