नवी दिल्ली – दिल्ली एनसीअार मध्ये रविवारी  सायंकाळी  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. भूकंपाचे धक्के जाणवताच दिल्लीत अनेकांनी घर आणि कार्यालयाबाहेर धाव घेतली. यावेळी लोकांमध्ये भिती पसरली होती.

आज सायंकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी दिल्ली शहर हादरले. भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल एवढी नोंदविली गेली.

दिल्लीतील भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील ‘झज्जर’ असल्याचं सांगितलं जातं आहे. भूकंपाच्या बाबतीत सांगायच झाल तर दिल्ली शहर हे अत्यंत संवेदनशील मानले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)