काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी योग्य परिस्थिती : शाह फैसल

श्रीनगर – काश्‍मीर प्रश्न सोडविण्याची वेळ आली आहे. राजकीय समस्यांवर सैन्य तोडग्याने काहीच प्राप्त होणार नसल्याचे उद्‌गार माजी आयएएस अधिकारी शाह फैसलने काढले आहेत. फैसलने प्रशासकीय सेवेचा त्याग करत आता राजकारणात पदार्पण करण्याची तयारी चालविली आहे.

स्वतःच्या राजकीय कारकिर्दीसाठी सामान्यांकडून देणगी जमविण्यासाठी (क्राउड फंडिंग) मोहीम सुरू केलेल्या फैसलने 1994 मध्ये कुपवाडा येथे 27 जणांच्या झालेल्या मृत्युप्रकरणी टिप्पणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सैन्यमार्गाने तोडगा काढण्याच्या प्रयत्नात दोन्ही बाजूला बळी जातात असा दावा त्याने केला आहे. फैसलने 9 जानेवारी रोजी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)