मालदिवमध्ये अध्यक्षांच्या शपथविधीला मोदी उपस्थित राहणार

नवी दिल्ली – मालदिवमध्ये 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नवीन अध्यक्षांच्या शपथविधीच्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन सरकारच्या काळात बिघडलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा हा प्रयत्न असणार आहे. मालदिवचे नियोजित अध्यक्ष मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेले निमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले आहे, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी सांगितले. मात्र मालदिवची ही भेट द्विपक्षीय संबंधांसाठी नाही, असेही रवीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

“नेबर्स फर्स्ट’ या धोरणाला अनुसरून भारताने मालदिवबरोबरच्या संबंधांना अधिक महत्व दिले आहे. दोन्ही देशांमधील भागीदारीचे संबंध अधिक दृढ करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही रवीश कुमार यांनी स्पष्ट केले.

मालदिवचे माजी अध्यक्ष यमीन यांचा ओढा चीनकडे अधिक राहिल्यामुळे भारत मालदिवदरम्यानचे संबंध ताणले गेले होते. तेथे भारतीयांच्या वर्क व्हिसावर निर्बंध आणले गेले होते. यावर्षी 5 फेब्रुवारीला मालदिवमध्ये आणीबाणी आणली गेली. त्यावर भारताने टीकाही केली होती. 23 सप्टेंबरला मालदिवच्या अध्यक्षांची निवडणूक झाली. त्यामध्ये सोलिह यांनी यामीन यांचा पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)