लालूंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

रांची – राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. लालू यादवांसाठी हा निर्णय मोठा झटका असल्याचे मानले जातेय.

लालू यादव सध्या रांची तुरुंगात चारा घोटाळयाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. लालू यादव यांनी वय आणि आजारपणाचा दाखला देत देवघर, चायबासा आणि दुमका प्रकरणी 11 डिसेंबर रोजी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. लालू 71 वर्षांचे झाले असून त्यांना मधूमेह, रक्तदाबासह अन्य आजार झाले आहेत. चारा घोटाळयाप्रकरणी त्यांना यापूर्वी देखील जामीन मिळाला आहे.

गंभीर आजार पाहता चांगल्या उपचारांसाठी जामिनाची सुविधा प्रदान केली जावी, असे याचिकेत म्हटले गेले होते. लालू हे 23 डिसेंबर 2017 पासून तुरुंगात आहेत. राजद प्रमुखांवर सध्या रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील बुधवारी त्यांची प्रकृती बिघडल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती. परंतु डॉक्‍टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)