कमलनाथ यांच्याकडून ‘त्या’ शिक्षकांवरील कारवाई रद्द

जबलपूर – मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करणाऱ्या एका शिक्षकावर जिल्हा प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली होती. मात्र स्वत: कमलनाथ यांनी शिक्षकाला माफ केले असल्यामुळे आता ही कारवाई होणार नाही.

तत्पूर्वी कमलनाथ यांना डाकू म्हणणाऱ्या मुख्याध्यापकाविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले असून या मुख्याध्यापकाविरूद्ध चौकशीचेही आदेश देण्यात आले होते. चौकशी अहवाल येईपर्यंत मुख्याध्यापकाची बदली जिल्हा शिक्षण कार्यालयात करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जबलपूरमधल्या एका शाळेमधला हा प्रकार आहे. इथले मुख्याध्यापक मुकेश तिवारी यांनी शिवराजसिंह चौहान आमचे आहेत आणि कमलनाथ डाकू आहेत असे विधान केले होते.

त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते संतापले. शासकीय कर्मचाऱ्यानी असे निवेदन जाहीरपणे करणे बरोबर नाही. असे कॉंग्रेसच्या काही कार्यकत्याचे म्हणणे होते. त्यांनी जिल्हाधिकारी छवी भारद्वाज यांची भेट घेतली आणि तिवारी यांच्यावर कारवाईची मागणी केली. या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तिवारी यांचे निलंबन केले होते. मात्र आता कमलनाथ यांच्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)