सीमा प्रश्नावर आंदोलन तीव्र होणार

महाराष्ट्र एकीकरण समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

बेळगाव – सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने दहा फेब्रुवारीपर्यंत योग्य ती पावले उचलावीत. सीमाप्रश्नी न्यायालयात काम पाहणाऱ्या वकिलांशी चर्चा करून न्यायालयातील कामकाजासाठी आवश्‍यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करावी असे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर आमच्या मागण्याना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर अकरा फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात आला आहे.
सतरा जानेवारी पाळण्यात येणाऱ्या हुतात्मा दिन आणि तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे आयोजित युवा मेळाव्याबाबत चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. यावेळी मोठ्या प्रमारताकार्यकर्ते उपस्थिीत होते. अशी बैठक पुन्हा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने सर्वोच्य न्यायालयात सीमाप्रश्‍नी काम पाहणाऱ्या वकिलांशी सातत्याने चर्चा करणे आवश्‍यक आहे. मात्र गेल्या काही दिवसांत दाव्याबाबत आवश्‍यक गोष्टींची पूर्तता होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्याधिकार समितीची बैठक बोलवावी आणि सर्व अडचणी दूर करव्यात, अशी मागणी करण्यात आली.

हुतात्मा दिनी सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन यावेळी दळवी यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी त्वरित चर्चा करावी अशी मागणी केली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)