प्रत्येक निर्णयात कॉंग्रेसचा हस्तक्षेप : कुमार स्वामी

बेंगळूर – अलीकडेच सत्तेत आलेल्या निधर्मी जनता दल -कॉंग्रेस आघाडी सरकारमधील नेत्यांचा ताळमेळ जुळलेला नाही. कॉंग्रेसच्या कुरबुरी दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे. बदली असो किंवा नेमणूक, सर्वच बाबतीत कॉंग्रेस नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले पाहिजे. कॉंग्रेस वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्य़ावरच आपल्याला निर्णय घ्यावे लागत आहेत.

सर्वच बाबतीत कॉंग्रेस नेते पक्षश्रेष्ठींची शिफारसपत्रे घेऊन आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे नाईलाजाने आपल्या पक्षाच्या आमदारांकडे दुर्लक्ष करून कॉंग्रेस आमदारांना प्राधान्य द्यावे लागत आहे. आपल्यावर अनेक जबाबदाऱ्य़ा आहेत. परंतु हात बांधून ठेवण्यात आल्यामुळे कॉंग्रेसच्या सुचनेनुसार पावले टाकावी लागत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युती सरकारमध्ये आपल्याला अहोरात्र काम करावे लागत आहे. कॉंग्रेस नेत्यांचा जाच सहन करावा लागत आहे. त्यांनी आपले हात बांधून ठेवले आहेत. त्यामुळे प्रशासन आपल्या हाती नसून कॉंग्रेसकडे आहे, अशी व्यथा कुमारस्वामी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत मांडली.

बैठकीप्रसंगी कुमारस्वामी यांनी आपल्या समस्या उघडपणे मांडत कॉंग्रेस वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. राज्याचा विकास, पक्षाच्या हितासाठी काम करण्यासाठी आपण कॉंग्रेस नेत्यांचा त्रास सहन करीत आहे. हा त्रास केवळ आपल्यालाच ठाऊक आहे. मुख्यमंत्रीपद त्रासदायक ठरत आहे. कोणावरही टीका करू नका, असा सल्ला वरिष्ठ नेते देवेगौडा यांनी दिला आहे. त्यामुळे आपण त्यांच्या सूचनेनुसार कोणतेही बेधडक विधान करणार नाही. ग्राम साहाय्यकांच्या बदल्याही कॉंग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच होत आहेत, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)