गंगा शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष -राजेंद्र सिंह

कोलकात्ता – लोकांना नदीत निर्माल्य टाकल्यास अटक होते, पण कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गंगा नदीत दूषित सांडपाणी सोडले जाते. अशा कंपन्यांवर काहीच कारवाई होत नाही, अशी टीका आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी केली आहे. ते गंगा सद्‌भावना यात्रेनिमित्त कोलकात्यात असून त्यांनी कोलकात्यात पत्रकारांशी संवाद साधला.

गंगा नदीच्या वादावर ते म्हणाले, गंगा नदी आयसीयूत असून नमामी गंगे या योजनेमुळे नदीचे शुद्धीकरण होऊ शकलेले नाही. या योजनेअंतर्गत गंगा घाटांचा पुनर्विकास करण्यात आला. पण गंगा नदीचे शुद्धीकरण हे अजूनही स्वप्नच आहे, असे त्यांनी सांगितले. मोदींनी आधी गंगा नदी मातेसमान असल्याचे सांगितले. 3 महिन्यात गंगा नदीचे शुद्धीकरण सुरू करण्याचे आश्वासन दिले. पण अजूनही त्यांनी काहीच केले नाही. गंगा नदीची अवस्था आजही दयनीय आहे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गंगा सद्‌भावना यात्रा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमार्गे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे पोहोचली. 111 दिवसांत जवळपास अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करुन ही यात्रा कोलकात्यात पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान गंगा किनारी वसलेल्या गावांमध्ये नदीच्या रक्षणासंदर्भात जनजागृती करण्यात आली. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)