अकार्यक्षम ‘एटीएम’वर संसदीय समिती नाराज

नवी दिल्ली – एटीएम असूनही अनेकवेळेस त्यात पैसेच शिल्लक नसतात. यामुळे पुरेशी रोकड वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. अशा सतत बंद पडणाऱ्या एटीएम केंद्रांबाबत उपाययोजना कराव्यात, अशी सूचना संसदीय समितीने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला केली आहे.

बॅंकांनी पुरेशा प्रमाणात एटीएम चालू ठेवावीत, अशी सूचना अर्थ विषयावरील स्थायी समितीने रिझर्व्ह बॅंकेला केली. जगाच्या तुलनेत देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झालेले नाही. त्यामुळे एटीएम ही पुरेशा प्रमाणात असावीत, असे संसदीय समितीने म्हटले आहे. या समितीचे प्रमुख कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोटांबदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने रोकड पुरवठा करण्यासाठी केलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे समितीने म्हटले आहे. ग्रामीण आणि निम्न शहरात अनेक एटीएम बंद होत आहेत. वाढत्या अर्थव्यवस्थेत रोकडची मागणी वाढत असतांना, सध्याचे एटीएम पुरेसे नसल्याची चिंता संसदीय समितीने व्यक्त केली. बॅंका बंद असतांना, तसेच बॅंक कर्मचाऱ्यांच्या संप काळातही ग्राहकांची एटीएम सेवेवर मुख्य भिस्त असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)