मध्य प्रदेशातील जनतेसाठी “टायगर अभी जिंदा है!’

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचे जनतेला आश्‍वासन

भोपाळ -पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा कॉंग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपच्या या पराभवाला मी स्वतः जबाबदार असल्याचे शिवराजसिंह यांनी मान्य केले आहे. शिवराजसिंह यांनी लगेच मुख्यमंत्री निवास सोडले. त्यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी हे वक्तव्य केले.

शिवराजसिंह चौहान म्हणाले, की मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी पाच वर्षे पण लागणार नाहीत. मुख्यमंत्री निवासात लवकरच परतणार आहे. राज्यातील नागरिकांनी दिलेले अपार प्रेम, स्नेह याबद्दल मी आभारी आहे. बुधनी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसोबत मी आहे. आपण सर्व मिळून मध्य प्रदेशच्या विकासासाठी काम करू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)