मनोहर पर्रिकर यांच्यावर ‘दिल्लीत’ होणार उपचार

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्याने गुरुवारी संध्याकाळी कलंगुट येथील एका खासगी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले होते. मात्र आता पर्रिकर यांच्यावर पुढील उपचार हे दिल्लीत होणार आहेत.

आज दुपारनंतर पर्रिकर हे विशेष विमानाने दिल्लीत दाखल होणार आहेत. दिल्लीमध्ये एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार आहेत. ते गेल्या दोन दिवसापासून गोव्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होते. दरम्यान मनोहर पर्रिकर हे एडवांस पैंक्रियाटिक कॅन्सर या आजाराने ग्रस्त असून यावर ते उपचार घेत आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे सप्टेंबर महिन्यातच अमेरिकेतून उपचार घेऊन परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच सुमारे तीन महिने अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरु होते. सप्टेंबर महिन्यातच ते जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हापासून ते सराकारी बैठकीत सहभागी झाले नव्हते. घरातूनच ते काही फाइल्स पास करत होते. आता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एकदा गुरुवारी संध्याकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)