विधानसभा ‘निवडणुक तिकिट’ इच्छुकांसाठी मध्यप्रदेश काँग्रेसचे नवीन फर्मान 

नवी दिल्ली – मध्यप्रदेशमध्ये चालू वर्षाअखेर विधानसभा निवडणुक होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष लागले आहेत. मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणुक तिकिटासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना एक पत्र लिहिले आहे आणि तिकिटासाठी दावेदारी करण्यापूर्वी उमेदवारांसाठी काही अटी ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी सुध्दा मंदिर, मठाचे संचालक, साधू आणि काही प्रमुख व्यक्तींची माहिती गोळा करत आहे, याकडे आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी म्हणून पाहिलं जात आहे.

मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवाराच्या फेसबुक पेज वर 15,000 लाईक, ट्विटर अकाउंटवर 5,000 फाॅलोअर आणि बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना घेऊन व्हाॅटसअॅपवर ग्रुप बनविलेलेले असले पाहिजेत, अशी अट ठेवली आहे.

तसेच त्या उमेदवाराला मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरील प्रत्येक पोस्टला लाईक आणि री-ट्विट करावं लागेल. मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारास 15 सप्टेंबरपर्यत ट्विटर, फेसबुक आणि व्हाॅटसअॅप संबंधी माहिती मध्यप्रदेश सोशल मीडिया आणि आयटी विभागामध्ये जमा करण्यास सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)