भाजपबरोबर मित्रपक्षांनाही फटका

आगामी निवडणुकाबाबत तटस्थ विश्‍लेषकांनी व्यक्‍त केला अंदाज

नवी दिल्ली – पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवापाठोपाठ येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 103 जागा गमावू शकतो, असा दावा ब्रुकिंग इन्स्टिट्यूट्‌स या अमेरिकी थिंक टॅंकने केला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाजही या संस्थेने व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाणा आणि मिझोरम या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा नुकताच पराभव झाला होता. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल. भाजप देशभरात एकूण 103 जागांवर पराभूत होऊ शकतो आणि त्याच्या जागा 179 पर्यंत खाली येऊ शकतात. भाजपच्या सहकारी पक्षांनाही नुकसान होऊ शकते आणि त्यांच्या जागा 28 पर्यंत खाली येऊ शकतात, असे या अहवालात म्हटले आहे.

ब्रुकिंग इन्स्टिट्यूट्‌सने गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा रोख आणि सध्याच्या लोकसभेतील जागांच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या, तर सहकारी पक्षांना 54 जागा मिळाल्या होत्या.

मात्र त्यातील अनेक सहकारी पक्ष आता एनडीए सोडून गेले आहेत. दुसरीकडे, कॉंग्रेसला 63 जागा अधिक मिळतील व त्यांच्या जागा 107 पर्यंत जातील, असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या सहकारी पक्षांच्या 38 जागा वाढण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर सुरुवातीच्या काही महिन्यात सकारात्मक वातावरण होते. मात्र त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकात भाजपाला पराभव सहन करावा लागलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर या अंदाजाला महत्त्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)