नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील जवाहरला नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हा 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे. कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (भाकपा) उमेदवार म्हणून महाआघाडीच्या (काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना) सहकार्याने 2019 च्या लोकसभेच्या निवडणूकीत उतरणार आहे. अशी माहिती बिहारमधील भाकपाचे महासचिव सत्यनारायण सिंह यांनी दिली आहे.

सत्यनारायण सिंह यांनी सांगितले की, कन्हैया कुमार याने लोकसभा निवडणूक ही बेगुसराय येथून लढवण्याबाबत आमच्या पार्टीसहित महाआघाडीतील सर्वाचे एकमत झाले आहे.

राजद आणि काँग्रेस व इतर पक्षानाही वाटते की कन्हैय्या कुमार याने निवडणूक लढवावी. तसेच लालू प्रसाद यादव यांच्याकडूनही कन्हैया कुमारच्या उमेदवारीबाबत समर्थन दर्शवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)