नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना १०० कोटी दंडाची नोटीस  

नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्राप्तिकर विभागातर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये दोघानांही १०० कोटी रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्या २०११-१२ या वर्षांतील प्राप्तिकराची फेरतपासणी करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये दिली होती.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्राप्तिकराची फेरतपासणी केल्यास राहुल गांधी यांचे २०११-१२ उत्पन्न १५५.४१  कोटी रुपये तर सोनिया गांधी यांचे उत्पन्न १५४.९६ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. आणि ऑस्कर फर्नांडिस यांचे त्या वर्षातील उत्पन्न ४८.९३ कोटी रुपये होते. यामुळे राहुल आणि सोनिया गांधी यांनी ३०० कोटींचे उत्पन्न लपवले असल्याने प्राप्तिकर विभागाने त्यांना १०० कोटी रुपये भरण्याची नोटीस पाठवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे प्रकरण 
यंग इंडियन प्रा. लि. ही कंपनी ५० लाख रूपयांच्या भाग भांडवलावर सन २०१० साली सुरू करण्यात आली. या कंपनीने नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची मालकी असलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची सारी मालमत्ता संपादीत केली होती. हे शेअर्स संपादीत करताना गांधी परिवाराने गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)