एनजीटीने दिल्ली सरकारला ठोठावला 25 कोटीचा दंड

नवी दिल्ली : दिल्लीच्या वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यावर अपयश ठरत असलेल्या दिल्ली सरकारला राष्ट्रीय हरित प्राधिकरणने (एनजीटी) दंड ठोठावला आहे. एनजीटीने दिल्ली सरकराला 25 कोटी रूपयांचा दंड आकारला आहे. दंडाची ही रक्कम दिल्ली सरकारच्या तिजोरीतून नाही तर सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे.

एनजीटीने स्पष्ट सांगितले आहे की, दिल्ली सरकारला ही रक्कम एकदम जमा करणे शक्य नसेल तर दिल्ली सरकारकडून प्रत्येक महिना 10 कोटी रूपये दंड वसूल केला जाईल. एनजीटीने सोमवारी एक जुन्या प्रकरणाच्या सुनवाई दरम्यान हा निर्णय जाहीर केला.

-Ads-

एनजीटीने प्रदूषणाशी निगडीत 6-7 याचिकेवर सोमवारी निर्णय सुनावला. या दरम्यान दिल्ली सरकारने मागील आदेशाचे पालन न केल्याचे दिसून आले. दरम्यान यापूर्वी  आॅक्टोबरमध्ये एनजीटीने दिल्ली सरकारवर दिल्ली-एनसीआर मध्ये प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर 50 कोटी रूपयांचा दंड ठोठावला होता. आम आदमी सरकारवर हा दंड दिल्लीमध्ये प्रदूषण प्रसरविणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात अपयशी ठरल्यानंतर ठोठावण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)