गोवा पतंग महोत्सवाला चांगला प्रतिसाद

पणजी -गोव्यात होणारा यंदाचा पतंग महोत्सव 17 व 18 जानेवारी रोजी मांद्रे समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. दर वर्षी या महोत्सवाला पर्यटकाकाडून प्रतिसाद वाढत आहे. गोव्यात होणाऱ्या या महोत्सवात बेल्जियम, कॅनडा, इस्टोनिया, टर्की, मलेशिया, जर्मनी, ब्रिटन, रशिया आणि इटालीहून प्रत्येकी दोनजण सहभागी होणार आहेत.

तसेच अस्ट्रेलिया व सिंगापूरमधून एक एक जण सहभागी होणार आहे. त्यात आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. बेळगावच्या परिवर्तन परिवाराकडून दरवर्षी गोवा पर्यटन महामंडळाच्या सहकार्याने अयोजित करण्यात येणारा हा अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव मिरामार समुद्र किनाऱ्यावर होत होता. परंतु यंदा तो मांद्रे समुद्र किनाऱ्यावर होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पतंग महोत्सव राज्यात सर्वत्र करण्यात यावा अशी सूचना राज्य सरकारची होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे अशोक नाईक यांनी दिली. पतंग महोत्सव 17 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता सुरू होईल तर 18 जानेवारीला दुपारी 2 वाजता त्याचा समारोप होणार आहे.

विदेशातून येणारे कलाकार पतंग उडविण्याच्या त्यांच्या छंदासाठी येतात. त्यांना मानधन दिले जाते. शिवाय या महोत्सवासाठी त्यांच्या राहण्याचा आणि इतर खर्च सुमारे 32 लाख रुपयांपर्यंत होतो. पर्यटन महामंडळाकडूनही या कार्यक्रमासाठी सहकार्य दिले जात असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असे सरकारला वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)