National Film Awards : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोपरांत जाहीर झाला आहे.  65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज झाली. त्यावेळी विनोद खन्ना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. राजेंद्र जंगलेची ‘चंदेरीनामा’ बेस्ट प्रमोशनल फिल्म म्हणून निवडण्यात आलीय, तर ‘मृत्यूभोग’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाला स्पेशल मेन्शन पुरस्काराचा मान मिळालाय, तर ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला ‘न्यूटन’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)