National film awards : ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या परिक्षकांच्या ज्युरीचे नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले होते.

६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. ‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सुयश शिंदेच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मने जिंकली असे म्हणायला हरकत नाही.

* बेस्ट मराठी फिल्म- कच्चा लिंबू
*बेस्ट हिंदी फिल्म- न्यूटन
*स्पेशल मेन्शन अवॉर्ड- अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)
*बेस्ट अॅक्ट्रेस- श्रीदेवी (मॉम)
*बेस्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली: द कन्क्लुजन
*बेस्ट अॅक्शन- बाहुबली: द कन्क्लुजन
*बेस्ट नॉन फिचर फिल्म- वॉटर बेबी
*बेस्ट एज्युकेशनल फिल्म- द गर्ल्स वी वर अँड द वुमन वी आर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)