क्रूड तेलाचे भाव घटल्याने पेट्रोल स्वस्त होण्याची शक्‍यता 

लंडन – क्रूड तेलाचे दर शुक्रवारी गेल्या 7 महिन्यात प्रथमच प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली गेल्यामुळे देशातील प्रमुख तेल उत्पदक कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरामध्ये आणखी कपत होण्याची चिन्हे आहेत. गेल्या 20 दिवसांत पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेने इराणमधून तेल आयात करण्यावर निर्बंध लादले होते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत होते. याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेलच्या दरावर होत होता. पण अमेरिकेचे हे निर्बंध झुगारून युरोपातील अनेक राष्ट्रांनी पेट्रोलची आयात सुरू केली आहे.

अमेरिकेने भारत, चीन आणि जपानसह आठ देशांना या निर्बंधांमधून सूट दिली आहे. यामुळे कच्च्या तेलाचे भाव गडगडले आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. सध्या दिल्लीत पेट्रोल 78 रुपये लिटरच्या भावाने, तर मुंबईत 83 रुपये लिटरच्या भावाने मिळते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)