शेतकऱ्यांची माहिती जमविण्याच्या सूचना : राजीवकुमार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने काल पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याचे ठरविले आहे. डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मार्चअखेर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणे अपेक्षित आहे. यासाठी बॅंकिंग यंत्रणा तयार आहे.

मात्र, नेमक्‍या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे लागलीत याची पुरेशी माहिती तयार स्वरूपात नाही. त्यामुळे राज्यांनी याबाबत शक्‍य लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करावी, असा सूचना राज्यांना जारी करण्यात आल्या असल्याची माहिती निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही राज्यांना संदर्भात अगोदरच पत्र लिहिले आहे. या योजनेचा देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मार्चअखेर या 12 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये दिले जाणे अपेक्षित आहे. ही रक्‍कम केंद्र सरकार उपलब्ध करणार आहे. मात्र शेतकऱ्यांची माहिती राज्यांना संकलित करून उपलब्ध द्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)