राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धाक ; शरद पवार, मायावतींनी घेतली माघार- शिवसेना

मुंबई: शरद पवार लढत नाहीत, मायावती लढणार नाहीत. पंतप्रधानपदाच्या दोन संभाव्य व स्वप्नाळू उमेदवारांनी माघार घेतली यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धाक जाणवतो. पंतप्रधानपदासाठी मोदी यांचा मार्ग निर्धोक आहे व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय पक्का आहे. पवार व मायावतींच्या माघारीचे तेच संकेत आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आणि बसपा नेत्या मायावती यांच्यावर टीका केली आहे. मायावती यांनी असे सांगितले की, मला देशभरात पक्षाचा प्रचार करायचा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मायावती यांच्या पक्षाची जी काही ताकद आहे ती उत्तर प्रदेशातच. बाकी देशभरात त्यांच्या पक्षाला स्थान नाही. त्यामुळे देशात प्रचार करायचा म्हणून लढायचे नाही ही पळवाट असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशी पळवाट शरद पवार यांनी माढा मतदारसंघात शोधली. तरुणांना संधी मिळावी यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. आता हे तरुण त्यांच्या घरातच होते व ते मावळ लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. पवार हे राष्ट्रीय राजकारणात पुराणपुरुष आहेत. नेहमीप्रमाणे विरोधकांची मोट बांधण्याचे काम ते करीत आहेत, पण स्वतःच्या घरात व पक्षात ते अशी मोट बांधू शकले नाहीत व शेवटी त्यांनाच मैदान सोडावे लागले. एकाच घरातील किती जणांनी लढायचे? हा प्रश्न त्यांनी विचारला, पण माढ्यातून लढायचे त्यांनी आधी पक्के केले व नंतर माघार घेतली. तरुणांसाठीच ही माघार असेल तर मग तरुण नेत्यालाच तेथून आधी उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्न देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)