दिल्लीमध्ये पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 22 पैशांनी महागले

विविध शहरातील इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (88.12), डिझेल (77.32)
चेन्नई : पेट्रोल (83.91), डिझेल (76.98)
कोलकत्ता : पेट्रोल (83.61), डिझेल (75.68)
पुणे : पेट्रोल (87.97), डिझेल (75.98)

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सोमवारी पुन्हा वाढ झाली. पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 23 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 22 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 80.73 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 72.83 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

दिल्लीमध्ये 31 आॅगस्ट 2018 रोजी म्हणजेच दहा दिवसांपूर्वी  पेट्रोलचा दर प्रतिलीटर 78.52 रूपये तर डिझेलचा प्रतिलीटर दर 70.21 रूपये इतका होता. गेल्या दहा दिवसांमध्ये दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 2.21 रूपये तर डिझेलच्या दरात 2.62 रूपयांनी वाढ झाली आहे.

इंधन दरांनी जनसामान्यांचे कंबरडे मोडल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी कर कमी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.मात्र, इंधनांवरील कर कमी करण्याचा मोदी सरकारचा तूर्त कुठलाही विचार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांवरील बोजा वाढत चालला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)