दिल्लीमध्ये महिन्यात पेट्रोल 3.16 रूपये तर  डिझेल 3.60 रूपयांनी महागले

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा पेट्रोल 16 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले आहे.आज दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 79.31 रूपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 71.34 रूपये असा आहे.

मागील एक महिन्यापासून दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 3.16 रूपये प्रति लिटर तर डिझेलच्या किंमतीत 3.60 रूपये प्रति लिटर अशी दरवाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलच्या किंमतीतील चढउतार आणि डाॅलरच्या तुलनेत रूपयांच अवमूल्यन होत असल्याने इंधनदरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आगामी काळातदेखील या किंमती वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

इतर प्रमुख शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे :

मुंबई – पेट्रोल (86.72 रूपये), डिझेल (75.74 रूपये)
चेन्नई – पेट्रोल (82.41 रूपये), डिझेल (75.39 रूपये)
कोलकत्ता – पेट्रोल (82.22 रूपये), डिझेल (74.19 रूपये)
पुणे – पेट्रोल (86.58 रूपये), डिझेल (74.44 रूपये)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)