दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दराने 80 रूपयांचा टप्पा अोलांडला

मुंबई – पेट्रोल (87.77), डिझेल (76.98 )
चेन्नई – पेट्रोल (83.54), डिझेल (76.64 )
कोलकत्ता – पेट्रोल (83.27 ), डिझेल (75.36 )
पुणे – पेट्रोल (87.63 ), डिझेल (75.65 )

नवी दिल्ली – सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारे इंधन दरवाढीचे सत्र कायम आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे अनुक्रमे 39 आणि 44 पैशांची वाढ झाली. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पेट्रोल 2 रूपये 85 पैशांनी तर डिझेल 3 रूपये 30 पैशांनी महागले आहे.

सध्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाने नीचांकी मूल्य गाठले आहे. त्यामुळे कच्च्या इंधनाच्या आयातीसाठीचा खर्च वाढला आहे. त्यातून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. ताज्या दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल लिटरमागे 80.38 रूपयांवर तर डिझेल 72.51 रूपयांवर पोहचले आहे.

दिल्लीमध्ये 1 जानेवारी 2018 पासून ते 8 सप्टेंबर 2018 पर्यंत डिझेलच्या किंमतीत एकूण 12.54 रूपयांनी तर पेट्रोलच्या किंमतीत 10.41 रूपयांनी वाढ झाली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)