दिल्लीतील प्रदूषणासाठी केंद्र, हरियाणा आणि पंजाब सरकार जबाबदार : केजरीवाल

संग्रहित छायाचित्र....

नवी दिल्ली  : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरील यांनी राजधानी दिल्लीतील हवेच्या वाढत्या प्रदूषणांसाठी केंद्र, पंजाब आणि हरियामा सरकारला जबाबदार ठरविले आहे.

केजरीवाल यांनी सोमवारी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘राजधानीमध्ये पूर्ण वर्षभर प्रदूषणाची पातळी एका निश्चित मर्यादेपर्यत होते. मात्र यावेळेस केंद्र, हरियाणा आणि पंजाब सरकार यांच्यामुळे राजधानीतील नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केजरीवाल पुढे म्हटले की, ‘आम आदमी पक्षाच्या सर्व प्रयत्नांच्या नंतरही केंद्र, हरियाणा आणि पंजाब सरकार कोणतेही पाऊल उचलण्यास इच्छुक नाही. त्यांनी दावा केला आहे की, ‘त्या राज्यातील शेतकरी आपपल्या राज्यातील सरकारमुळे दु:खी आहे’.

दरम्यान या तीन राज्यातील शेतकरी धान्याच्या कापणीनंतर उरलेले धान्याचे अवशेष म्हणजेच धसकटे जाळतात. त्यामुळे यातून निघणाऱ्या विषारी धुरांमुळे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री इमरान हुसैन यांनी राजधानीमध्ये हवेच्या प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी अधिकारी आणि संस्थांना युध्दपातळीवर काम करण्यास सांगितले आहे.

दिल्लीतील खासगी वाहनांचा वापर कमी करण्याची शिफारस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)