दिल्ली सरकारने नाही, तर केंद्र सरकारने टॅक्स वाढवला आहे : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली – देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे मोदी सरकारला टीकाकारांना सामोरे जावे लागत आहे. मोदी सरकार इंधन दरवाढीमुळे सतत विरोधीपक्षाच्या निशाण्यावर आहे. इंधन दरवाढीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माध्यमांनी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘टॅक्स दिल्ली सरकारने नाही, तर केंद्र सरकारने वाढवला आहे’.

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने सगळीकडे महागाई वाढत आहे. एकीकडे आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकार टॅक्स वाढवत आहे. आमच्या सरकारने नाही तर केंद्र सरकारने टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे टॅक्स हा केंद्र सरकारने कमी करायला हवेत. तसेच मागील 3 वर्षात केंद्र सरकारने जेवढा टॅक्स वाढवला आहे तो परत घेतला पाहिजे’.

दरम्यान, काॅग्रेसने देखील इंधन दरवाढीच्या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी येत्या 10 सप्टेंबर रोजी भारत बंद चा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)