भाजपकडून निवडणूकीसाठी राष्ट्रवादाची पळवाट 

नवी दिल्ली: राफेल विमानांच्या व्यवहारावरून कॉंग्रेसकडून भाजपला कोंडीत पकडले जात असताना भाजपकडून मात्र राफेल आणि सीमेवरील घुसखोरी या दोन्ही मुद्दयांना पळवाट म्हणून राष्ट्रवादाच्या आधारे निवडणूकीचा प्रचार केला जाण्याची शक्‍यता आहे. सुरक्षिततेच्या मुद्दयावर केंद्र सरकारकडून कठोर धोरणाची अंमलबजावणीही केली जाण्याची शक्‍यता आहे, असे भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. “सर्जिकल स्ट्राईक’च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित “पराक्रम पर्व’चे आयोजन त्याच हेतूने केले गेले असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

बेकायदेशीर घुसखोरीच्या मुद्दयावर भाजप अध्यक्ष अमित शहा हे पूर्वीपासूनच आक्रमक आहेत. पुढील वर्षीच्या निवडणूकांच्यापूर्वी घुसखोरांना देशाबाहेर काढले जाईल, असा आक्रमक पवित्राही त्यांनी व्यक्‍त केला आहे. घुसखोरांची ओळख निश्‍चित करण्यासाठी “नॅशनल रजिस्ट्रार ऑफ सिटीझन्स’चीही मदत घेतली जाणार आहे. असे भाजपच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

-Ads-

“एनआरसी’ला जोरदार विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या पश्‍चिम बंगालमध्येच लक्षावधी घुसखोर असल्याचा प्रचार भाजपकडून आक्रमकपणे केला जाऊ लागला आहे. महाराष्टात माओवादी कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप न करण्याचे स्पष्ट केल्याने हा मुद्दाही भाजपकडून आक्रमकपणे मांडला जाणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)