हरियाणा सरकार चालू करणार मजुरांसाठी स्वस्तात उपहारगृहे

चंदीगढ : हरियाणा सरकार मजुरांसाठी पाच नवीन उपहारगृहे सुरु करणार आहे. त्यामध्ये कामगारांना स्वस्तात म्हणजे दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ही उपहारगृहे  पांचकुला, अंबाडा, पानिपत, कर्नाल, भिवानी याठिकाणी उभारण्यात येणार आहेत. अशा स्वरुपाची  उपहारगृहे सोनीपत, गुरगाव, यमुनानगर, फरिदाबाद येथे कार्यान्वित आहेत, अशी माहिती रोजगारमंत्री नायबसिंग सायनी यांनी दिली.

नोंदणीकृत कामगारांना सरकारद्वारे मिळणा-या योजनांचा लाभ घेता येणार आहे. राज्यात भाजप सरकार सत्तेवर येण्यापुर्वी केवळ 7,497 कामगार नोंदणीकृत होते. आता ही संख्या वाढून 1,20,908 झाली आहे.  कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी 23 कल्याणकारी योजना सरकार राबवित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)