राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी नगरचे चार खेळाडू

दिल्ली येथे होणाऱ्या सीबीएसई बोर्डच्या शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेल्या गार्गी मोहळे, ऐशनी गोरेगावकर, दिया जासूद, नताशा आव्हाड, त्यांच्या समवेत सचिन भापकर, प्रणिता तरोटे, राजू पवार, सिरील पंडित.

नगर – दिल्ली येथील नोयडा मधील लोटस इंटरनॅशनल स्कुल येथे दि 12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या सीबीएसई बोर्डच्या शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी नगरमधील महावीर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटर (एमएमवायटीसी) च्या गार्गी मोहळे, ऐशनी गोरेगावकर, दिया जासूद, नताशा आव्हाड या चार खेळाडू विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

या संघासोबत टीम प्रशिक्षक म्हणून प्रणिता तरोटे व व्यवस्थापक सचिन भापकर जाणार आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक उमेश झोटिंग व क्रीडा शिक्षक राजू पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

संपूर्ण जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डच्या शाळांमधून या विद्यार्थांची निवड झाली. या खेळाडूचे यशश्री अकॅडमीच्या संचालक अनुरिता शर्मा, उपसंचालक यश शर्मा, सेक्रेटरी गणेश शर्मा शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)