नथुराम गोडसे टेररिस्ट; कोणालाही जीव घेण्याचा अधिकार नाही- प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर: बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम गोडसे हा व्यक्ती म्हणून टेररिस्ट असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसऱ्याचा जीव घ्यायचा तर त्याला टेररिस्ट म्हटलं पाहिजे. परंतु तो जर कुठल्या धर्माला फॉलो करत असेल तर तो अख्खा धर्म टेररिस्ट आहे, असं कधी होत नाही असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते कोल्हापुरात बोलत होते.

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर बहुजन वंचित आघाडीने विधानसभेची व्यूहरचना आखण्यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आज कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या नियोजन कोणत्या पद्धतीने असेल हे स्पष्ट केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोणत्याही माणसाला धर्म जोडणे चुकीचे आहे. तो हिंदू होता म्हणून टेररिस्ट आहे असे मी म्हणत नाही या देशात नथुराम गोडसे हे टेररिस्ट आहे. याचं कारण म्हणजे कोणालाही कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही दुसऱ्याचा जीव घेणाऱ्याला टेररिस्ट म्हटले पाहिजे.

लोकसभा  निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला ? या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले काँग्रेस-राष्ट्रवादी हे मराठा समाजाचे पक्ष आहेत. आम्ही त्याला हात घातलेला नाही. आम्ही फक्त ओबीसी मतदारांना हात घातलेला आहे आणि पारंपरिक ओबीसी मतदार हा तिसऱ्या आघाडीचा मतदार आहे. मध्यंतरी तिसरी आघाडी नव्हती त्यावेळेस भाजप हाच पक्ष होता परंतु पर्यायी वंचित आघाडी उभी राहिली आणि ओबीसींना चॉईस मिळाला. आम्ही नुकसान केलं असं वाटत असेल तर तर दोघांचेही नुकसान केल आहे तर आम्ही एकाच केले नाही तर दोघांचे केला आहे

लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्हाला कोणीही निवडून येतो म्हणून जमेत धरत नाही तर राज्य पातळीवर ती आम्ही बहिष्कृत आहोत. परंतु राष्ट्रीय पातळीवर देखील आम्हाला निवडून येतो म्हणून कोणी गृहीत धरत नाही. 23 नंतर बराच मोठा बदल घडेल. लोकसभेच्या निवडणुका घासून-पुसून होणार आहेत त्यामुळे फार मोठी लीड कोणाला असेल, असे मला वाटत नाही जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी निवडून आलेला असेल शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल काय होणार नाही याची उत्सुकता शेवटपर्यंत राहील

आज कोल्हापुरात झालेल्या राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत कोणाबरोबर अलाईन्स न करण्याचा निर्णय यावेळी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तर कार्यकर्त्यांचं मत आहे की राज्यातील 288 विधानसभेच्या जागा आपण स्वबळावर लढवाव्यात त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आहोत परंतु आम्ही कोणाला सोबत घ्यायचं त्यासाठी आम्हाला त्यांचे विचार पटनं गरजेचे आहे, असे देखील ते म्हणाले आहेत

भाजपकडे सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळेस त्यांना वाटत होतं की आम्ही सर्व राजकीय पक्षांना गिळंकृत केलेलं आहे. तेव्हा कुरघोडी करून आपल्याला पाहिजे ते संविधान आणता येईल हे त्यांच्या लक्षात आलं. परंतु इथला मतदार इतका मजबूत आहे आणि त्याचं ठाम मत आहे कि नवीन संविधान अपेक्षा हेच संविधान चांगले आहे. आपल्याला पाहिजे ते करता येते त्यामुळेच संविधान पाहिजे आहे. त्या अनुषंगाने मतदान झालेला आहे.  भाजपचे सध्या आपण संविधान विरोधी नाही तर आम्ही संविधानवादी आहोत असं नाटक सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)