नथुराम गोडेसचे गुणगान करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाईची गरज नाही 

राज्य सरकारचे स्पष्टिकरण; याचिका निकाली 
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गुणगान करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने आज निकाली काढली. या संकेतस्थळाची सर्व प्रकारे चौकशी केल्यानंतर त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. या संकेतस्थळावर अनेक वर्षापूर्वी एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्यांच्या इंग्रजी पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. या संकेतस्थळावर कोणतीही माहिती नव्याने दिली गेली नसल्याने कारवाईची गरज नसल्याचे राज्य सरकारने आज न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने घेतली आणि याचिका निकाली काढली. मात्र याचिकाकर्त्याला पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करण्याची मुभा दिली आहे.
15 नोव्हेंबर 2015 ला नाना गोडसे यांनी एक संकेतस्थळ सुरू केले आणि त्यावर नथुराम गोडसेचे गुणगान करण्यास सुरूवात केली. नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 ला गोळ्या झाडून गांधीजींची हत्या का केली? याचे सविस्तर स्पष्टिकरण या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. त्यामुळे हा देशद्रोहाचा प्रकार असून संबंधितांवर देशाविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई करावी. अशी मागणी मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या संदर्भात पुणे तसेच मुंबई पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)