नसीरुद्दीन शाह यांचे इम्रान खानला सडेतोड उत्तर

नवी दिल्ली: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाण साधत म्हणाले होते की, अल्पसंख्यकांना कसे वागवाचये ते मोदी सरकारला दाखवून देवू. यावर अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी इम्रान खान यांना सडतोड उत्तर दिले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत नसीरुद्दीन शाह म्हणाले, मला वाटतं, मिस्टर इमरान खान यांनी त्याच मुद्यावर भाष्य केले पाहिजे, जे त्यांच्या देशाशी संबंधित आहे. ज्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही, त्यावर त्यांनी बोलू नये. मागील 70 वर्षांपासून आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे आमची काळजी कशी घ्यावी, हे आम्हाला समजते.

दरम्यान, बुलंदशहरातील गोहत्याच्या अफवेवरुन ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही या वादात उडी घेतली. इमरान खान यांनी शाह यांच्या वक्तव्याला मोहम्मद अली जिना यांच्या वक्तव्याशी जोडले. त्यामुळे नसीरूद्दीन शाह चांगलेच भडकले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्यकांबरोबर कसे वागायचे हे शिकवू, असे इमरान खान म्हणाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)