नासा सोलर प्रोबचा सूर्याच्या जवळ जाण्याचा विक्रम 

वॉशिंग्टन – नासाच्या पार्कर सोलर प्रोबने सूर्याच्या सर्वाधिक जवळ जाण्याचा विक्रम केला आहे. 29 ऑक्‍टोबर रोजी पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या 26.55 दशलक्ष मैलांपेक्षा अधिक जवळ पोहचले. आजवर कोणतेही मानवनिर्मित यान सूर्याच्या इतक्‍या जवळ पोहोचले नव्ह्ते. त्याने अमेरिकन-जर्मन हेलियस-4 अंतराळयानाचा सूर्याच्या जवळ जाण्याचा विक्रम मोडीत काढल्यचे नासाने जाहीर केले आहे.

2 सप्टेंबर 1976 रोजी अमेरिकन-जर्मन हेलियस-4 अंतराळयानाने सूर्याच्या सर्वाधिक जवळ जाण्याचा विक्रम केला होता. तो आता सोलर प्रोबने मोडला असून या पुढे पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या जवळ जांण्याचे आपले स्वत:चेच विक्रम मोडत जाणार आहे. सन 2024 मध्ये आपल्या अंतिम टप्प्यात ते सूर्याच्या विक्रमी 3.83 दशलक्ष मैल इतक्‍या सर्वाधिक जवळ पोहचणार आहे. 31 ऑक्‍टोबर रोजी ते सूर्याची भ्रमणकक्षा ओलांडून जाणार आहे. असे प्रोजेक्‍ट मॅनेजर अँडी ड्रीज्मन यांनी जॉन हॉपकिन्स अप्लाईडस्‌ फिजिक्‍स लॅबमधून सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चालू वर्षी 12 ऑगस्ट रोजी सूर्याची आजवर मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळवण्यासाठी पार्कर सोलर प्रोबने सूर्यावर स्वारी करण्यासाठी सूर्याच्या दिशेने कूच केले आहे. सूर्याची गूढ गुपिते शोधणे, त्याच्या वातावरणाचा अभ्यास करणे आणि त्यांचा अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम पाहण्यासाठीची त्याची ही मोहीम 7 वर्षांची आहे. निघाल्यापासून 78 दिवसातच त्याने विक्रमी अंतर पार केले आहे. पार्कर सोलर प्रोबचे सूर्यापासूनचे अंतर आणि त्याचा वेग डीएसएन (डीप स्पेस नेटवर्क) च्या वापराने मोजली जातात.

डीएसएन सोलर प्रोबकडे सिग्नल पाठवते, तेच सिग्नल सोलर प्रोब पुन्हा डीएसएनकडे पाठवते, त्यावरून शास्त्रज्ञांची टीम सोलर प्रोबचा वेग, दिशा आणि जाग़ा निश्‍चित करते. आपल्या प्रवासात सोलर प्रोबल प्रचंड उष्णता आणि किरणोत्सर्ग सहन करावा लागणार आहे.पण तो मानवाला सूर्यासंबंधी आजवर अज्ञात असलेली माहिती पुरवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)