नरेंद्र पाटील मातोश्रीवर

उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय रविवारी होणार

सातारा – माथाडींचे नेते व अण्णासाहेब पाटील महामंडळांचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. शुक्रवारी दुपारी मातोश्री निवासस्थान येथे झालेल्या भेटीवेळी नरेंद्र पाटील सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा निर्णय मी व मुख्यमंत्री घेणार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, साताऱ्याची मिसळ दिल्लीत पोहचण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतची घोषणा दि.24 रोजी कोल्हापुर येथील मेळाव्यात जाहीर होईल, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी घेतलेल्या भेटीवेळी ना.सुभाष देसाई, माजी मंत्री डॉ.दिपक सावंत, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार दगडुदादा सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, राजकीय नेते शक्‍यतो बंद कमऱ्यामध्ये भेटतात. मात्र, नरेंद्र पाटील हे उघडपणे भेटायला आलेले आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे या भेटीचा अर्थाचा अनर्थ काढण्यात येवू नये. त्यांच्या बद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय मी आणि देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी घेण्यात येईल व तो जाहीर केला जाईल.

युतीचे सर्व नेते व कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. त्यामुळे सर्व 48 जागा युती जिंकेल, असा आत्मविश्‍वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेनेने शुक्रवारी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. येत्या दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)