युवा अभिनेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट ! राष्ट्रनिर्माण आणि जीएसटीवर चर्चा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच काही बॉलीवूड स्टार नी भेट घेतली आहे. सदर भेटीचा एक फोटो समोर आला असून यामध्ये बॉलीवूड स्टार सोबत नरेंद्र मोदी देखील दिसत आहेत. अभिनेता रणवीर सिंह यांनी आपल्या खास शैलीत सेल्फी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता, दिग्दर्शक करण जोहर आणि महावीर जैन यांनी हि मिटिंग नियोजित केली होती. या मीटिंगमध्ये खास करून युवा अभिनेत्यांचा सहभाग होता. दरम्यान, राष्ट्र घडवण्यामध्ये युवा अभिनेत्यांचा सहभाग आणि जीएसटी या विषयावर चर्चा करण्यात आली.

रणबीर कपूर, आलिया भट्ट, भूमि पेडनेकर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल, रणवीर सिंह, आयुष्मान खुराना आणि राजकुमार तसेच अश्विनी अय्यर, एकता कपूर, करण जौहर आणि रोहित शेट्टी मीटिंगमध्ये उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)