नवी दिल्ली – सध्या दिल्लीत २०१९ लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत शिगेला पोहचला आहे. आज (८ मे रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘रामलीला मैदानावर’ भव्य प्रचारसभा आयोजित केली असून, मोदींच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर, दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस महासचिव ‘प्रियांका गांधी वाड्रा’ या सुध्दा प्रचारसभा घेणार आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर-पूर्व दिल्लीतील काँग्रेसच्या उमेदवार ‘शीला दीक्षित’ यांच्यासाठी ते दिल्लीच्या लोकांना आवाहन करणार आहे. शीला दीक्षित उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे.
या सभेला दिल्लीच्या कानाकोपऱ्यातून लोकांना सभेला पोहचता यावं यासाठी ‘पाच हजारां’हून अधिक बस बुकिंग केल्या आहे. या सभेसाठी जागोजागी पारंपरिक वाद्यांसह वादक उभे असतील. ते मोदींचे स्वागत करतील. रामलीला मैदानाजवळच्या परिसरात लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून ‘मोदी-मोदी’ असा नारा देतील. झेंडे, बॅनर फडकावून मोदींचं स्वागत करतील. मैदानाच्या आत आणि बाहेर प्रत्येकी दहा एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. मोदींच्या या सभेला गर्दी जमवण्यासाठी आणि सभा हिट होण्यासाठी दिल्लीतील भाजप नेते आणि इतर पदाधिकाऱ्यांना मोठे टार्गेट देण्यात आले आहे. मोदींच्या या सभेसाठी तब्ब्ल ५ हजार हुन अधिक बस बुकिंग केल्या असून, रामलीला मैदानाच्या आत आणि बाहेर प्रत्येकी दहा एलइडी स्क्रीन लावणार आहे.