नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान

नवी दिल्ली: २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी आज सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्यासोबत राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी देखील केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले.

राष्ट्रपती भवनात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवरांनी सुद्धा उपस्थित लावली आहे. दरम्यान, आजच्या सोहळ्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील राष्ट्रपती भवनात उपस्थित आहेत.

https://twitter.com/BJP4India/status/1134091579776331776

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)