रामपूर (उत्तर प्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट असल्याचे वक्तव्य आझम खान यांनी केले आहे.
रामपूर येथील प्रचार सभेत बोलताना आझम खान यांनी ही टीका केली असून, इम्रान खान यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसतील आणि तेव्हाच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाद मिटेल. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत असे ते म्हणाले. याच्या अगोदर नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या नवाज शरीफ यांच्याशी मैत्री केली होती. आणि आता त्यांनी इम्रान खान यांच्याशी देखील मैत्री जमवल्याचे आझम खान यावेळी म्हणाले.
#WATCH Azam Khan, Samajwadi Party in Rampur: Aap kal Nawaz Sharif ke dost the, aur aaj Imran Khan aapke dubara Wazir-e-Azam banne ka intezaar kar raha hai. Batao logon, Pakistan ka agent main hun ya … ? (11.04.2019) pic.twitter.com/TBO4yrUftG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 12, 2019