नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीनंतर मोदींनी यांनी ट्विट करत या भेटी दरम्यानचे फोटो शेअर केले आहे.
Meeting Pranab Da is always an enriching experience. His knowledge and insights are unparalleled. He is a statesman who has made an indelible contribution to our nation.
Sought his blessings during our meeting today. pic.twitter.com/dxFj6NPNd5
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2019
या भेटीनंतर मोदींनी प्रणव मुखर्जी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत ट्विट केले आहे,’ ‘प्रणव दा यांना भेटून नेहमीच चांगला अनुभव येतो. त्यांची माहिती आणि अनुभव अद्वितीय आहे. त्यांनी आपल्या राष्ट्राला खूप काही दिले आहे. असे ट्विट केले आहे. आजच्या भेटीत मी प्रणव दा यांचा आशीर्वाद घेतला आहे.