नरेंद्र दाभोळकरांचे साहित्य इंग्रजीत

पुणे- नरेंद्र दाभोळकर यांचे साहित्य आता इंग्रजीत उपलब्ध होणार आहे. दाभोळकरांनी आपले विचार, तत्वाज्ञान शब्दरुपाने “तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकात मांडले आहे. अशा या महत्वपुर्ण पुस्तकाचा इंग्रजीमधील अनुवाद लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. इंग्रजीमधून दाभोळकरांचे लेखन अनुवादीत झाल्याने आंतराष्ट्रीय पातळीवरील वाचकांसाठी त्यांचे विचार जाणून घेता येणार आहे. डॉ.दाभोळकरांचे अनेक वर्षापासून सहकारी असलेले सुमन ओक यांनी या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.

अंधश्रद्धा निर्मुलनाशी संबंधित सर्व विषयांची अभ्यासपुर्ण,सखोल तात्विक मांडणी या पुस्तकात आहे. युगानुयुगे समाजाला लागलेले अंधश्रद्धच्या ग्रहणाचा तिमिरभेद करून तेजाकडे वाटचाल करता येईल असा विश्‍वास वाचकांमध्ये निर्माण करण्यासाठी हे पुस्तक मोलाची कामगीरी बजावेल असा विश्‍वास डॉ.दाभोळकरांचा होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ.दाभोळकरांवे “तिमिराकडून तेजाकडे’ हे पुस्तक त्यांच्या लेखणातील मह्त्वाचे मानले जाते. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले मूळचे मराठीतील हे पुस्तक 450 पेक्षाही अधिक पृष्ठसंख्या आसणारे आहे. यामध्ये डॉक्‍टरांनी अंधश्रद्धेच्या सोबतीनेच इतरही अनेक गोष्टींविषयी आपल्या नेहमीच्या सहज आणि प्रवाही शैलीत मूलगामी विवेचन केले आहे. या प्रदीर्घ लेखनाचा अनुवाद ओक (वय 87) यांनी सहा वर्षांपूर्वी, 2012 मध्ये डॉक्‍टर हयात असतानाच केला होता. मात्र, त्याचे पुस्तक आजवर येऊ शकले नव्हते. आता येत्या सप्टेंबरमध्ये ‘द केस फॉर रिझन : अंडरस्टॅंडिंग द अँटी सुपरस्टिशन मूव्हमेंट’ या नावाने हा अनुवाद सर्व वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. ते दोन खंडांत असेल. डॉ. दाभोलकरांच्या खून झाल्याच्या घटनेस येत्या 20 ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर हे पुस्तक येणे महत्त्वाचे मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)