राणे समितीचा अहवाल घाईगडबडीतला

सुभाष देशमुख : मराठा आरक्षण देण्यास सरकार प्रयत्नशील

पुणे – मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तयार करण्यात आलेला नारायण राणे समितीचा अहवाल हा अतिशय घाई गडबडीत तयार करण्यात आला होता. त्यात फारशी स्पष्टता नसल्याने अनेक अडचणी आमच्या सरकारसमोर होत्या, असे स्पष्टीकरण देत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी नारायण राणे समितीच्या अहवालावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनापासून मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता न्यायालयीन काम बाकी असून, मराठा समाजाला निश्‍चितपणे आरक्षण मिळेल, असा विश्‍वास देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणासह धनगर व इतर आरक्षणासंदर्भात सरकारची नेमकी भूमिकाही देशमुख यांनी स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आणि अन्य समाजाच्या आरक्षणाचे प्रश्‍न भाजप सरकार शंभर टक्के मार्गी लावेल. आरक्षणाव्यतिरिक्त मराठा समाजातील तरुणांसाठी नवउद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. त्याचे व्याज सरकार भरणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

तसेच, शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधले जाणार आहे. यासाठी संस्था आणि समघटकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज द्यायचा आहे. त्यासाठीच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न सरकार सोडवेल. आतापर्यंत फक्त सोलापूरमधून मागणी झाली असून, ते काम लवकरच होईल, असेही देशमुख यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)