पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना पितृशोक

कोल्हापूर: नारायणराव नांगरे-पाटील (वय 79) यांचे मंगळवारी (दि. 4) दुपारी एक वाजता कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे ते वडील होत.
नारायणराव नांगरे-पाटील यांचे कोकरूड (ता. शिराळा, जि. सांगली) हे मुळगाव. या भागातील प्रसिद्ध पैलवान अशी त्यांची ओळख होती.

राजकारणात ठसा उमटवताना कोकरूड गावचे सरपंच ते शिराळा पंचायत समितीचे सभापती अशी पदे भूषवली. तसेच विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक म्हणूनही परिचित होते. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक पद्माकराव मुळे यांचे व्याही होत. नारायणराव नांगरे-पाटील यांच्यावर कोल्हापूर येथे पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोकरूड या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय व्यक्तींनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)