कोल्हार खुर्द येथे सर्वधर्म समभाव रथाचे स्वागत 

कोल्हार खुर्द : अखंड भारत देशात केवळ सर्वधर्म समभावाची जागृती करण्यासाठी निघालेल्या सोलापूर जिल्ह्यातील भिगवण येथील रथाच राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून साठ फूट लांबी आणि पंधरा फूट रुंदी असलेल्या रथामध्ये पंचधातूची अठरा फूट उंची असलेली जवळपास 8500 किलोची मूर्ती घेऊन सोलापूर जिल्ह्यातील भिगवण येथे आश्रम असलेल्या हवामल्ली महाराजांचे अनुयायी 2014 मध्ये 8500 किलो वाहनांची पंचधातूची भगवान महादेवाची मूर्ती घेऊन निघाले आहेत. हा रथ संपूर्ण बारा जोतिर्लिंगांचे दर्शन घेऊन ते साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

हा रथ विश्रांतीसाठी कोल्हार खुर्द येथे थांबला असता गावातील ग्रामस्थांनी या रथाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. रथावर असलेली मूर्ती ग्रामस्थांचे लक्ष वेधत होती. रथावर असणारे स्वयंसेवक देखील आपले अनुभव सांगत होते. े गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण भारतभर सर्व धर्म समभावाची शिकवण देण्यासाठी उभारण्यात आलेल्या महादेवाच्या रथाचे सारथ्य रमजान शेख नावाचा मुस्लिम बांधव करत होता. या रथावर रमजान शेख, सिद्धू रुपनुरे, व्यंकटेश शिवराल, शेषराव सावंत, शिवाजी वक्राळ, हनुमंत सांगुलगी, गणेश अमरने हे भक्त होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)